Thursday, March 22, 2012

मराठी संशोधक-मिश्कीन इंगावले

मिश्कीन इंगावले

कोण हा मिश्कीन इंगावले?? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आला असेल .तर मी  आजच्या पोस्ट मध्ये मिश्कीनची ओळख करून देत आहे.
  मराठी झेंडा सातासमुद्रापलीकडे फडकवणारा ,अ‍ॅनिमीया सारख्या रोगावर संशोधन करणारा,जगाला आपल्या  संशोधनाने आश्चर्य करणारा असा हा मिश्किन इंगावले.
कालच मी  TED.com या साईटला भेट दिली. आणि TED वर अगदी सुरुवातीलाच एक व्हीडीओ पाहिला मिश्कीन इंगावले (Myshkin Ingawale) या तरुणाचा. एका मराठी, महाराष्ट्रीय, भारतीय तरुणाला TED सारख्या जगभरात नावाजलेल्या व्यासपीठावर आपल्या संशोधनाबद्दल उस्फुर्तपणे बोलताना पाहून अतीशय अभिमान वाटला.
             
मिश्कीन इंगावले ने एक असे यंत्र बनविले आहे  ज्यामुळे अ‍ॅनिमीया सारख्या रोगाची तपासणी करणे अतिशय सोपे झाले आहे. मूळात अ‍ॅनिमीया हा आजार बरा करण्यासारखा आहे आणि त्यासाठीची औषधे सहज आणि स्वस्तात उपल्ब्ध देखिल आहेत. मात्र तरीही केवळ अ‍ॅनिमीयाची वेळीच तपासणी न केल्यामुळे जगभरात दर मिनिटाला २ व्यक्ती मरण पावतात  
ओळख:-
             
मिश्कीन ने  National Institute of technology, भोपाल मधून विद्युत अभियांत्रीकीची पदवी मिळवलेली आहे आणि त्याचबरोबर मिश्कीनने आय.आय .एम  कलकत्ता (IIM Calcutta ) मधून पीएचडी केली आहे.त्याचसोबत तो MIT (Massachusetts Institute of Technology) मध्ये कोपनहेगन बाईक या ईलेक्ट्रीक सायकलच्या प्रोजेक्टवर काही काळ काम करत होता.

 प्रेरणा :-
          
सुट्टीमध्ये एकदा मुंबई पासुन २ तासांवर असलेल्या पारोल या गावी मिश्कीन  त्याच्या मित्राला भेटण्यासाठी गेला होता. त्याचा मित्र अभिषेक सेन तेथे डॉक्टर आहे. तेथे मिश्कीन पोहोचला तेव्हा तेव्हा अभिषेक एक बाळंत बाईला तपासण्यासाठी गेला होता. मात्र अ‍ॅनीमीया मुळे बाळ व आई दोघेही वाचू शकले नाहीत. मिश्कीनला हे कळल्यावर त्याला वाटले की जर हा बरा करता येण्यासारखा आजार आहे तर केवळ वेळीच आजार न ओळखला गेल्यामुळे असे मृत्यु का ओढवावेत. त्याने आपल्या डॉक्टर मित्राच्या सहाय्याने यावर उपाय शोधायचे ठरवले.

कामाची रूपरेषा :-
      
अ‍ॅनीमीया तपासण्यासाठी रक्ताचा नमुना घेतला जातो आणि असे रक्त मग एका यंत्रामध्ये तपासले जाते. हे यंत्र महाग असून ग्रामीण आणि दुर्गम भागात उपलब्ध नसते. तेव्हा अशा ठीकाणी काम करणार्‍या आशा-वर्कर्सना (गावोगावी प्राथमिक उपचार करणार्‍या परिचारीका ) सहजगत्या अ‍ॅनीमीयाची तपासणी करता यावी, त्यांना सोबत नेता यावे असे हलके यंत्र बनविण्याचे मिश्कीनने ठरवले. मुख्य म्हणजे रक्ताचा नमुना न घेता, म्हणजेच सुई न टोचता तपासणी करणारे यंत्र बनवण्याचा त्याचा मानस होता. अथक प्रयत्नांनंतर मिश्कीनने हे काम पूर्ण केले. त्याने खिशात मावेल असे Touch B नावाचे एक यंत्र बनवले ज्यामुळे साधी सुईदेखिल न टोचता जागच्या जागीच अ‍ॅनीमीयाची चाचणी करता येते. हे यंत्र २ AA बॅटरीवर चालणारे हे यंत्र एखाद्या Calculator सारखे दिसते.

मिश्कीनचे  स्वप्न :-
            समाजातील एका वरकरणी साध्या पण तरीही गुंतागुंतीच्या समस्येवर मात करण्याच्या विचाराने प्रेरीत होऊन मिश्कीनने हे उपकरण बनविले. आणि आता २०२० पर्यंत जगाच्या नकाशावरुन अ‍ॅनीमीया नावाचा राक्षस मिटविण्याचे त्याने ठरवले आहे.

TED.com वरील मिश्कीनच्या भाषणाचा व्हीडीओ मी येथे देत आहे, तो अवश्य पहा. त्याच्या संशोधना ईतकाच त्याचे presentation skills, आत्मविश्वास, उस्फुर्तता हे सारे गुण वाखाणण्याजोगे आहेत. मला त्याची presentation स्टाईल खुप आवडली.


मिश्कीन इंगावले:-

Thursday, January 12, 2012

थोर मराठी समाजसुधारक -अण्णा हजारे

किसन बाबूराव हजारे ऊर्फ अण्णा हजारे (जून १५, इ.स. १९३७:भिंगार, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र ). मूळचे सैन्यात वाहनचालक असणारे किसन बाबुराव तथा अण्णा हजारे हे भारतातील एक ज्येष्ठ महाराष्ट्रीय समाजसेवक आहेत. १९९० साली त्यांना त्यांच्या समाज सेवेच्या कार्याबद्दल भारत सरकारने पद्मश्री आणि १९९२ साली पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार चळवळीद्वारे राळेगण सिद्धी या गावाचा कायापालट घडवून आणला आहे. स्वच्छता, पाणी व्यवस्थापन व सामाजिक सलोखा यावर त्यांनी भर दिला होता. या कामाबद्दल गावाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. या नंतर अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केले. माहितीच्या अधिकारावर त्यांनी पुस्तकाचे लेखनही केले आहे. या आंदोलनामुळे सरकारला माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना देण्याचा कायदा लवकर संमत करावा लागला. अण्णा हजारे यांनी वेळोवेळी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलने करून जनजागृतीची कामे केली आहेत. त्यांच्या आंदोलनांमुळे महाराष्ट्राच्या अनेक मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत.

बालपण


किसन हजारेंचा जन्म जून १५, इ.स. १९३७ रोजी भारताच्या मुंबई इलाख्यातील भिंगार मधील खोमणे वाड्यात झाला. हे गाव आता महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यात आहे.[२] हजारेंचे वडील बाबूराव हजारे तेथील आयुर्वेद आश्रम औषधशाळेत मजूर होते. बाबूरावांचे वडील ब्रिटिश फौजेत सैनिक होते. १९४५मध्ये आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर बाबूरावांनी सुरुवातीला भिंगारमध्येच बस्तान बसवले, पण नंतर १९५२ साली ते राळेगण सिद्धी या आपल्या मूळ गावी परतले. किसनला सहा लहान भावंडे होती व कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्याच्या आत्याने किसनची देखभाल करण्याचे ठरवले व शिक्षणासाठी त्या त्याला मुंबईला घेऊन गेल्या. सातवीपर्यंत शिकल्यावर घरात मदत व्हावी म्हणून किसनने शिक्षण सोडून नोकरी शोधण्यास सुरुवात केली. त्यासाठी सुरुवातीस दादरजवळ फुले विकली व नंतर स्वतःचेच दुकान थाटले व आपल्या दोन भावांना राळेगण सिद्धीहून बोलावले.

लष्करी सेवा

इ.स.१९६२ च्या  सुमारास चीनने भारतावर आक्रमण  केलेले असताना भारतीय सैन्याने  धडाक्यात भरती सुरू केली होती. त्यावेळ २५ वर्षांचे असलेले हजारे लष्कराच्या किमान शारीरिक क्षमतेस पात्र नव्हते, पण कोणत्याही परिस्थितीत नवीन जवान भरती करणे आवश्यक असल्याने लष्कराने त्यांना भरती करून घेतले. औरंगाबाद येथे सुरुवातीचे प्रशिक्षण घेतल्यावर १९६३मध्ये त्यांना वाहनचालकाचे पद दिले गेले.त्यानंतर दोन वर्षातच पाकिस्तानने  भारतावर चाल केली. त्यावेळी हजारेंचा मुक्काम पंजाबमधील खेमकरण  क्षेत्रात होता. नोव्हेंबर १२ ,इ.स.१९६५  रोज पाकिस्तानी वायुसेनेने भारतीय ठाण्यांवर हल्ले सुरू केले. हजारे त्यावेळी इतर वाहनांसह आपले वाहन चालवीत होते. या हल्ल्यात त्या तांड्यातील ते स्वतः सोडून एकूणएक जवान शहीद झाले. हे पाहून विषण्ण झालेल्या हजारेंनी जगण्यातील अर्थ शोधण्यास सुरुवात केली. आपल्या प्रवासात नवी दिल्ही  रेल्वे स्थानकावरील एका दुकानात त्यांच्या हाती राष्ट्रनिर्मितीसाठी युवा पिढीला आवाहन हे स्वामी विवेकानंद यांनी लिहिलेले पुस्तक पडले. हे वाचताना त्यांना गमले की अनेक संतांनी इतरांच्या सुखासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केलेला आहे. आपण आपले उरलेले आयुष्य गरीबांची दुःखे दूर करण्यात घालवावे असे त्यांना वाटू लागले. यानंतर फावल्या वेळात त्यांनी  महात्मा गांधी ,  स्वामी विवेकानंद आणि  यांचे साहित्य वाचण्यास सुरुवात केली.यानंतरकाही वर्षांनी १९७०च्या दशकात त्यांची मृत्यूशी पुन्हा एकदा जवळून गाठ पडली. वाहन चालवीत असताना भीषण अपघातातून ते बचावले. या क्षणी त्यांना वाटले की आपल्या उरलेल्या आयुष्याचा सदुपयोग करण्यासाठी जणू काही दैवच त्यांना इशारे देत आहे. वयाच्या ३८व्या वर्षी किसन हजारेंनी आपले उरलेले आयुष्य इतरांच्या सेवेसाठी वेचण्याचा संकल्प सोडला. १९७८मध्ये त्यांनी भारतीय लष्कराचा राजीनामा दिला.


राळेगण सिद्धी

लष्कर सोडल्यावर हजारे राळेगण सिद्धी या आपल्या मूळ गावी परतले हे गाव मध्य महाराष्ट्रातील   अहमदनगर  जिल्ह्याच्या  पारनेर तालुक्यात  आहे. जवळजवळ कायमच्या दुष्काळी प्रदेशात असलेल्या या दुर्लक्षित गावात त्यावेळी गरिबी आणि निराशेचा सुकाळ होता. हजारेंनी रामस्थांसह अनेक दशके अथक प्रयत्न करुन गावाचा कायापालट केला. आर्थिक आणि सामाजिक अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी गावातील परिस्थिती सुधारली. तंत्रज्ञान किंवा औद्योगिकीकरणाचा आधार न घेता केवळ अतोनात कष्ट आणि सहकार यांवर त्यानी गावातील गरिबी दूर करण्यात यश मिळवले.


आंदोलने आणि चळवळी

अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराचा निपटारा करण्याकरिता वेळोवेळी आंदोलने केली व प्रसंगी कारावासही स्वीकारला. १९८० पासून आतापर्यंत अण्णा हजारे यांनी १६ उपोषणे केली आहेत. प्रत्येक वेळी सरकारला त्यांच्यासमोर नमते घ्यावे लागले.त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. अण्णाची १६ पैकी १३ उपोषणे ही महाराष्ट्र सरकारच्या विरोधातील तर ३ उपोषणे केंद्र सरकारच्या विरोधात करण्यात आली आहेत.यांतील १५वे आणि १६वे उपोषण हे जनलोकपाल विधेयकासाठी  होते. अण्णांनी एकूण आतापर्यंत ११६ दिवसापेक्षा जास्त काळ उपोषण केले आहे. अण्णाच्या या उपोषणांमुळे आणि आंदोलनामुळे महाराष्ट्र सरकारला ४५० अधिकार्‍यांवर कारवाई करावी लागली तर ६ मंत्र्यांना आपले पद गमवावे लागले आहे.

पहिले उपोषण :-
अण्णांनी पहिले आंदोलन १९७९ मध्ये केले. शासकीय यंत्रणेकडून हेळसांड होऊन गावास वेठीस धरणार्‍या प्रशासनाविरुद्ध गावातील शाळेला मान्यता मिळण्यासाठी, या आंदोलनादरम्यान अहमदनगर जिल्हा परिषदेसमोर  अण्णांनी १९८० साली पहिले यशस्वी उपोषण केले. अण्णांच्या उपोषणाने एका दिवसातच सरकारी यंत्रणेला झुकविले. अण्णांची मागणी मान्य झाली. अण्णांच्या सक्रिय सामजिक चळवळीच्या जीवनातला हा पहिला प्रसंग होता. सत्याग्रहाच्या आणि अहिंसेच्या मार्गाच्या लढ्याने अण्णांना पहिल्यांदाच मोठे यश मिळविता आले होते. उपोषण केले, प्रशासन झुकले आणि शाळेला मान्यता मिळाली. 'नापासांची शाळा' म्हणून ही शाळा प्रसिद्ध आहे.

दुसरे  उपोषण:-
महाराष्ट्र सरकारतर्फे राबविल्या जाणार्‍या वीस कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी होण्याकरिता राळेगण सिद्धी  येथील संत यादवबाबा मंदिरात अण्णांचे दुसरे यशस्वी उपोषण ७ -८ जून १९८३ साली झाले. ग्राम विकास योजना अंमलात आणत असताना सरकारी अधिकार्‍यांची टाळाटाळ आणि निवडणूक यांच्या विरोधातील हे आंदोलनही यशस्वी झाले. दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात आली. ग्राम विकास योजनांच्या मंजुरीबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकार्‍यांनी लिखित आश्वासन दिले.उपोषण केले. याचा परिणाम म्हणून ग्रामविकासात सरकारचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला

तिसरे उपोषण:-
अण्णांनी तिसरे उपोषण २० ते २४ फेब्रुवारी १९८९ या काळात केले होते. हे उपोषण शेतकर्‍यांकरिता होते. गावाला पाणी पुरवठा करण्याचे धोरण व व ठिबक सिंचन अनुदान धोरण यांत फार त्रुटी होत्या. त्या त्रुटी दूर करण्यासाठी हे उपोषण होते. सरकार पुन्हा झुकले ४ कोटी रुपये मान्य करत सिंचन योजनांना मंजुरी देण्यात आली.

चौथे उपोषण:-
चौथे आंदोलन अण्णांना पुढील ९ महिन्यातच पुन्हा पुकारावे लागले. शेतकर्‍यांना सिंचनासाठी वीज पुरवठा मिळवून देण्यासाठीच्या प्रश्नासाठी २० ते २८ नोव्हेबर या दरम्यान १९८९ मध्ये ते पुकारण्यात आले होते. हे उपोषण ९ दिवस चालले. अखेरीस सरकारवर दबाव वाढला. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी लिखित आश्वासन दिले. वीज पुरवठ्यासाठी २५० केव्हीच्या लाईन आणि इतर सुविधांसाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले. दरम्यानच्या काळात अण्णांच्या कामाला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळू लागली होती.

पाचवे उपोषण:-
पाचवे उपोषण : सन १९९४ साली अण्णांनी वन विभागातील योजनामधील भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करण्याच्या निर्णय घेतला. सरकारशी अनेक वेळा संपर्क करुनही सरकारकडून कोणतही उत्तर मिळत नव्हते. अण्णाचे हे भ्रष्टाचाराविरोधातील पहिले उपोषण. महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे रोजी या उपोषणाला सुरवात झाली.हे उपोषण ६ दिवस चालले. १४ भ्रष्ट अधिकार्‍यांपैकी ४ अधिकार्‍यांना सरकारने निलंबित केले. दहा अधिकार्‍यांची चौकशी करुन कारवाई करू असे आश्वासन मिळाले.

सहावे उपोषण:-
पुढील ६ वे उपोषण अण्णांनी १९९६ साली केले. त्यातही त्यांना यश आले. राज्यातील शिवसेना-भाजपा युती-सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात ते करण्यात आले. २० नोव्हेंबर १९९६ रोजी त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. मंत्र्याविरोधातील आरोप असल्याने लढाई मोठी
होती. त्यामुळे उपोषणाचा कालावधीही वाढणार होता. उपोषण १२ दिवस चालले. आतापर्यंतचे अण्णाचे हे सर्वात मोठे उपोषण होते. ३ डिसेंबर १९९६ ला युतीच्या दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. जलसंधारण मंत्री होते महादेव शिवणकर आणि पाणी पुरवठामंत्री शशिकांत सुतार.अण्णांनी १९९७ सालीसुद्धा उपोषण केले.यावेळीही युती सरकारमधील भ्रष्टाचाराचाच मुद्दा होता. अण्णांच्या निशाण्यावर होते यावेळी युती सरकारमधील समाज कल्याणमंत्री बबनराव घोलप. उपोषण १० दिवस चालले. घोलपाना राजीनामा द्यावा लागला तर १८ अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले.अण्णानी थेट मंत्र्यांविरोधात सुरू केलेली लढाई साहजिकच अडचणींना आमंत्रण देणारी होती. घोलप न्यायालयात गेले होते. न्यायालयात अण्णा घोलपावरील आरोप सिद्ध करू शकले नाहीत आणि अब्रुनुकसानीच्या आरोपाखाली अण्णांना मॅजिस्ट्रेट कोर्टाने तीन महिन्यांची साधी कैद दिली होती. याच्याही विरोधात अण्णांनी ९ ते १८ आगस्ट १९९९ दरम्यान १० दिवसाचे उपोषण केले. त्याच वेळी पाच हजार रुपयांच्या बाँडवर सोडून देण्याची अटही कोर्टाने घातली होती. ती सवलत नाकारून हजारे यांनी तुरुंगात जाणे पसंत केले होते. मात्र नंतर राज्य सरकारने त्यांना स्वत:च्या अधिकारात तुरुंगातून मुक्त केले. पुढे अपिलात सेशन्स कोर्टाने अण्णांना निर्दोष ठरवले 
                 अशा प्रकारे अण्णांनी छोटी मोठी चौदा उपोषणे आतापर्यत  केलेली आहेत.

पंधरावे उपोषण:-
आता वेळ होती अण्णांच्या १५ व्या उपोषणाची केंद्राला इशारा देऊनही सरकार जागे होत नव्हते, जनलोकपाल कायद्याच्या मंजुरीसाठी हे उपोषण होते, भ्रष्टाचाराच्या विरोधातले हे आंदोलन. साहजिकचं भ्रष्टाचाराने पोळलेल्या जनसामान्यांनी अण्णांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला. ५ ते ९ एप्रिल २०११ रोजी हे उपोषण दिल्लीतल्या जंतर मंतर मैदानावर झाले. सरकारवर वाढलेल्या दबावाने सरकारनेनं अण्णांशी बोलणी सुरू केली. कायद्याच्या मसुद्यासाठी सरकारच्या ५ मंत्र्यासह अण्णा आणि त्यांच्या सिव्हिल सोसायटीच्या ५ सदस्यासह जॉइन्ट ड्राफ्ट कमिटी स्थापन झाली अण्णानी उपोषण मागे घेतले.

माहिती अधिकार:-

अण्णा हजार्‍यांनी माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केले. माहितीच्या अधिकार या विषयावर त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे. या आंदोलनामुळे सरकारला  महितेचा अधिकार  सर्वसामान्यांना देण्याचा कायदा  संमत करावा लागला.

लोकपाल कायदा:-

दोन सप्टेंबर २०११ पर्यंत(म्हणजे एकूण पंधरा दिवस) उपोषणाला परवानगी देतानाच रामलीला मैदानाचा काही भाग आंदोलनासाठी, तर काही भाग वाहनतळ म्हणून वापरण्याची अटही यात मान्य करण्यात आली होती. प्रशासनातर्फे रामलीला मैदानावर साफसफाई केली गेली. जयप्रकाश नारायण पार्कसारख्या छोट्या जागेऐवजी रामलीला मैदानासारखी मोठी जागा अण्णांना आंदोलनासाठी मिळाली. जयप्रकाश नारायण पार्कमध्ये केवळ पाच हजार आंदोलकांनाच परवानगी दिली जाणार होती, रामलीला मैदानात जागा भरेल इतक्‍या आंदोलकांना सहभागी होण्याची परवानगी मिळाली. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली, चंदीगड, बंगळूर, चेन्नई, मुंबई, पुणे, कोलकता या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली. दिल्लीमध्ये जंतर-मंतर व इंडिया गेट परिसरात आंदोलकांची गर्दी झाली होती. तिहारच्या बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी होती आणि ते अण्णा हजारे तुरुंगाबाहेर येण्याची वाट पाहत होते. विविध राज्यांमध्ये झालेल्या आंदोलनांत तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. देशभरात गावोगावी, शहरांमध्ये निदर्शने, मोर्चे, रॅली, 'कॅन्डल मार्च' काढून लहान मुलांपासून ते तरुण, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अशा समाजाच्या सर्व थरांतील घटकांनी अण्णांच्या आंदोलनाला भरभक्कम पाठिंबा व्यक्त केला होता.नुकतेच २६ डिसेंबर २०११ रोजी मुंबई येथे त्यांनी दोन दिवसांचे उपोषण केले.

पुरस्काराचे वर्ष         पुरस्काराचे नाव                            पुरस्कार देणारी संस्था
२००७                        जिट गिल मेमोरिअल अवॉर्ड         वर्ल्ड बँक
२००५                        मानद डॉक्टरेट                               गांधीग्राम रुरल युनिवरसिटी
२००३                         Integrity पुरस्कार                         Transparency International
१९९८                         CARE International Award           ARE (relief agency)
१९९७                         महावीर पुरस्कार    
१९९६                         शिरोमणी पुरस्कार    
१९९२                         पद्मभूषण                                          राष्ट्रपती
१९९०                         पद्मश्री                                                राष्ट्रपती
१९८९                        कृषिभूषण पुरस्कार                         महाराष्ट्र सरकार
१९८६                        इंदिरा प्रियदर्शिनी 

                                वृक्षमित्र पुरस्कार                            भारत सरकार




                                

                        किसन बाबूराव हजारे
जन्म   :-                                     १५ जून, इ.स. १९३७
                                                    भिंगार, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र
निवासस्थान :-                          राळेगण सिद्धी
राष्ट्रीयत्व  :-                               \भारतीय
टोपणनावे  :-                              अण्णा
नागरिकत्व:-                             भारतीय
शिक्षण :-                                   सातवी
पेशा :-                                        समाजसेवा
कारकिर्दीचा काळ:-                   १९६२-१९७८ (सैन्यदल)
मूळ गाव :-                                राळेगण सिद्धी
निव्वळ मालमत्ता:-                   शून्य
वजन  :-                                      ६८ किलो
कार्यकाळ  :-                              १९७८ पासून - (समाजसेवा)
राजकीय पक्ष :-                        कोणताही नाही
संचालकमंडळाचे सभासद  :-   नाही
धर्म  :-                                      हिंदू
जोडीदार:-                               अविवाहित
अपत्ये  :-                                नाहीत
वडील:-                                   कै.बाबूराव
आई:-                                     कै.लक्ष्मीबाई
पुरस्कार :-                            पद्मश्री, पद्मभूषण, कृषिभूषण(२००
८)

Tuesday, June 7, 2011

मराठी तत्त्वज्ञ-पांडुरंगशास्त्री आठवले

पांडुरंगशास्त्री आठवले
पांडुरंगशास्त्री आठवले (ऑक्टोबर १९ , १९२०- ऑक्टोबर २५, २००३) हे मराठी तत्त्वज्ञ होते. ते स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, संस्थापक होते. पांडुरंगशास्त्री आठवलेंचा जन्म ऑक्टोबर १९, १९२० रोजी रोहे या कोकणातील गावी झाला. त्यांचा जन्मदिवस स्वाध्याय परिवार जगभर मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात. त्यांना रेमन मॅगसेसे, टेंम्पलटेंट पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, पद्मविभूषण, अशा विविध पुरस्काराने गौरवण्यात आले.  पारंपारिक शिक्षणाबरोबर 'सरस्वती संस्कृत पाठशाळेत' संस्कृत व्याकरणाबरोबर न्याय, वेदांत, साहित्य, त्याचबरोबर इंग्रजी साहित्याचा अभ्यास पांडूरंगशास्त्री यांनी केला. त्यांना रॉयल ऐशियाटिक सोसायटी मुंबई या संस्थेने सन्माननीय सभासद पद देऊन सन्मानीत केले होते. या ग्रंथालयात त्यांनी कादंबरी विभाग सोडून सर्व मानव्य शाखेतील प्रमुख लेखकांचे, ग्रंथाचे अध्ययन केले.
            द, उपनिषदे, स्मृती, पुराणे यावर चिंतन केले. इ.स.१९९२ मधे त्यांना टिळक पुरस्कार मिळाला तो पुरस्कार देतांना तेव्हाचे राज्यपाल म्हणाले होते ' विद्वत्ता आणि दैवी शक्तीचा संगम झाल्यावरच समाजाचे आणि देशाचे हित सुरक्षीत राहते. पांडुरंग शास्त्री आठवले यांची शिकवण सर्व समाजाने आचरण्यात आणण्याची गरज आहे. पांडुरंगशास्त्री हे आजच्या युगातील दैदीप्यमान आशेचा किरण आहेत   आध्यात्मिक साधनेतून शेतकरी, मच्छिमार, आदिवासी यांच्यापासून शहरी भागांतील सुखवस्तू वर्गापर्यंत सर्व स्तरांमध्यगेल्या चार दशकांहून अधिक काळ समाजपरिवर्तनाची आत्मज्योत फुलविणारे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांचे शनिवारी २५ ऑक्टोबर २००३  रोजी गिरगावातील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने देहावसान झाले. ते ८४  वर्षांचे होते.  महाराष्ट्र आणि गुजरातेतच नव्हे , तर जगभर पसरलेल्या लक्षावधी स्वाध्यायींना पांडुरंगशास्त्री तथा दादांच्या निधनाचे वृत्त कळताच शोक अनावर झाला. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे पाथिर्व शनिवारी त्यांच्या ' एड्यूला इमारती ' तील निवासस्थानाहून त्यांची कर्मभूमी ठरलेल्या सी. पी. टँक येथील माधवबागेत नेण्यात आले, तेव्हा तेथे हजारो शोकाकुल स्वाध्यायींनी धाव घेतली. अंत्यदर्शनासाठी सायंकाळी त्यांचे पाथिर्व , ठाणे येथील (दादांनीच स्थापन केलेल्या) तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या संकुलात ठेवण्यात आले होते. मॅगसेसे , टेम्पल्टन या जागतिक किताबांसह भारतातील पद्मविभूषण व अन्य अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या पांडुरंगशास्त्री आठवले यांनी जाती-धर्माच्या भिंती भेदणारे असे आध्यात्मिक चिंतन कष्टकरी वर्गापर्यंत पोहोचविण्यावर भर दिला. आठवले यांच्यावर पाच वर्षांपूवीर् बायपास शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्या शरीरात पेसमेकरही बसविण्यात आला होता. त्यांना मधुमेहाचा व श्वसनाचाही त्रास होता. त्यामुळे सव्वा वर्षांपासून त्यांनी जाहीर प्रवचनातील सहभाग थांबविला. महिनाभरापूर्वी त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचाराअंती ते घरी आले. मात्र शनिवारी दुपारी साडेबारा वाजता अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात् त्यांच्या पत्नी निर्मलाताई, कन्या धनश्री तळवलकर तथा दीदी, जावई रावसाहेब तळवलकर आणि लक्षावधी स्वाध्यायी असा परिवार आहे. कोकणात जन्मलेल्या आठवले यांनी १९५८ मध्ये आपल्या कार्याची सुरुवात गुजरातेत सौराष्ट्रामध्ये केली. सुरुवातीला काही गावांमध्ये सुरू झालेली ही चळवळ चार दशकांत अमेरिका , इंग्लंड , आफ्रिकेपर्यंत पसरली. व्यसनमुक्ती , सामाजिक जबाबदारीचे भान , पर्यावरणसंवर्धन आणि स्वकष्टाने आत्मसन्मान जागवून समानता निर्माण करण्याचा मंत्र या सूत्रांवर त्यांच्या स्वाध्याय चळवळीचा पाया उभा राहिला. ' रिलिजस इकॉलॉजिस्ट ' अशा शद्बांतही त्यांचा गौरव काहीवेळा झाला. शेतकरी बंधूंच्या मुलांसाठी त्यांनी सहा कॉलेजे काढली होती. ठाण्यात गुरुकुल पद्धतीने चालणारे तत्त्वज्ञान विद्यापीठ त्यांनी सुरू केले; पण त्याचबरोबर रस्तारुंदीकरणाच्या वेळी त्यांनी तत्त्वज्ञान विद्यापीठाची जागा देऊन रस्त्याच्या कामाचा प्रारंभ केला व समाजाप्रती असलेल्या जबाबदारीचे दर्शन घडविले. आधुनिक युगातील विचारांची दिशा त्यांनी या चळवळीला दिली होती आणि त्यातूनच मच्छिमारांना एका दिवसाचे उत्पन्न आपल्या बांधवांच्या कुटुंबियांसाठी वापरण्याचा ' मत्स्यगंधा ' उपक्रम गेली २०  वषेर् सुरू राहिला. ' योगेश्वर कृषी ' सारख्या उपक्रमातून सामूहिक शेतीचा मंत्र त्यांनी दिला.

Tuesday, April 12, 2011

मराठी अभिनेत्री -जयश्री गडकर

जयश्री गडकर 
हंसा वाडकर यांच्यानंतर तमाशा - लावणीपटात त्यांची जागा कोण भरून काढेल आणि सोज्वळ, सात्विक भूमिका करणा-या सुलोचनाबाईंच्या जागी कोणाला घ्यावं, या प्रश् ‍ नांना जयश्री गडकर यांनी आपल्या चतुरस्त्र आणि कसदार अभिनयाने उत्तर दिलं. अष्टपैलू अभिनेत्री असाच यांचा वावर मराठी चित्रपटसृष्टीत राहिला. ‘सांगत्ये ऐका’ , ‘ सवाल माझा ऐका ’ , ‘ एक गाव बारा भानगडी ’ यांसारखे तमाशापट, ‘ मानिनी’ , वैशाख-वणवा ’ सारखे सोज्वळ चित्रपट तर ‘ मोहित्यांची मंजुळा’ सारखे ऐतिहासिक चित्रपटात त्यांनी विविधांगी भूमिका केल्या होत्या. ‘ अशी असावी सासू ’ या चित्रपटाची निर्मिती , कथालेखन आणि दिग्दर्शनही त्यांनी केले होते. अभिनय क्षेत्रातल्या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा २००३ सालचा व्ही. शांताराम पुरस्कार, विविध चित्रपटांसाठी राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत . मराठी चित्रपट महामंडळातर्फेही त्यांना चित्रभूषण ' जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. साठ आणि सत्तरच्या दशकात मराठी चित्रपटात जयश्री गडकर यांच्या भूमिका गाजल्या होत्या. आतापर्यंत त्यांनी मराठी, हिंदी आणि इतर भाषांमधल्या २५० चित्रपटांमध्ये काम केले होते. कर्नाटकातील कारवार जिल्ह्यात जन्मलेल्या जयश्री गडकर यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकिर्द सुरू केली. तमाशापटापासून सामाजिक आशय असलेले चित्रपट अशा विविध आशय असलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. जयश्री गडकर यांनी ‘ सासर माहेर ’ आणि ‘ अशी असावी सासू ’ या चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं होतं. ‘ मनिनी ’, ‘ वैजयंता ’, ‘ सवाल माझा ऐका ’ आणि ‘ साधी माणसं ’ या त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. नागपूर -  जयश्री गडकर या मराठी चित्रपट सृष्टीत ५० सोनेरी वर्ष यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या एकमेव अभिनेत्री होत्या. त्यांना प्रेमाची मानवंदना देण्यासाठी जयश्री गडकर प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या असामान्य कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी "जयश्री गडकर : नक्षत्रलेणं' हा ग्रंथ नागपूर शहरात 8 मार्च २००९ ला प्रकाशित करण्यात आला. मराठीतील दिग्गज अशा १२१ मान्यवरांनी जयश्रीबाईंविषयी खास आठवणी या पुस्तकात लिहिल्या आहेत. त्यांच्या कारकिर्दीतील काही खास प्रसंगांची विपूल अशी रंगीत व कृष्णधवल छायाचित्रे यात समाविष्ट आहेत. त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांच्या चित्रपटातील गाजलेली ५० गाणी, चित्रपटांचे कथानक, कलाकार, तंत्रज्ञांची सूची व शंभरहून अधिक हिंदी, गुजराती, पंजाबी इतर भाषांमधील चित्रपटांची माहिती या पुस्तकात आहे, जेष्ठ चित्रपट अभिनेत्री जयश्री गडकर यांचे शुक्रवारी पहाटे मुंबईत निधन झालं. त्या ६६ वर्षाच्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून आजारी असलेल्या गडकर यांचं शुक्रवारी २९ ऑगस्ट २०० रोजी पहाटे ३ वाजता हृद्यविकाराने निधन झाले. अभिनेते बाळ धुरी यांची ती पत्नी होती.


Monday, February 7, 2011

मराठी लोकशाहीर -विठ्ठल उमप

विठ्ठल उमप 
   मुंबईला उदरनिर्वाहासाठी आलेल्या उमप यांनी कामगार वस्तीत मेळ्यातून कामे केली. विठ्ठल उमप हे लोकशाहीर असले तरी त्यांना ‘ कवाल’ म्हणूनच लोक पूर्वी ओळखत. पण नंतर मात्र त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून, एक समर्थ लोककलावंत, अशी आपली ओळख निर्माण केली. लोकरंगभूमी, रंगभूमी, कव्वालीचे व्यासपीठ, काव्य संमेलने, रुपेरी पडदा, दूरचित्रवणीचा छोटा पडदा अशा अनेक माध्यमांमध्ये उमप यांचा सर्वत्र संचार होता. ‘ आला कागुद कारभारणीचा ’ ही लावणी, ‘ ऐका मंडळी कान देऊनी तुम्हा सांगतो ठेचात कुडी आत्म्याचं भांडण झालं भारी जोरात ’ , ‘ भूक लागलीया पाठी कशासाठी पोटासाठी ’ , ‘ माझ्या आईचा गोंधळ ’ , ‘ आईचा जोगवा ’ , ‘ आरती श्रीगणेशा जगदीशा ’ , ‘ वादळ वारा तुफान येऊ द्या ’ , ‘ ये दादा आवर रे ’ , ‘ फाटकी नोट मना घेवाची नाय ’ , ‘ भाता मीठ नही टाक्या ’ अशा वेगवेगळ्या लोकगीतांच्या गायनाने विठ्ठल उमप यांनी आपला स्वतंत्र ठसा लोकगीताच्या क्षेत्रात उमटविला. ‘ माझी मैना गावाकडं राह्यली ’ या गाण्यानं तर अनेकांचे डोळे पाणावले. १९८३ साली विठ्ठल उमप यांनी आयर्लंडमधील कॉर्क लोकोत्सव गाजविला होता. उमप केवळ लोकगीत गायनापाशी थांबले नाहीत. त्यांनी लोकरंगभूमीसोबतच नागर रंगभूमीवर संचार ठेवला. ‘ अरे रे संसार ’ , ‘ अबक दुबक ’ , ‘ विठो रखुमाय ’ , ‘ खंडोबाचं लगीन ’ , ‘ जांभुळाख्यान ’ या चाकोरीबाहेरच्या नाटकांसोबतच ‘ हैदोस ’ , ‘ बुद्धम्‌ शरणम्‌ ’ सारखी नाटके त्यांनी वर्ज्य मानली नाहीत.
लोककलेच्या सेवेसाठी आयुष्य वेचणा-या शाहीर विठ्ठल उमप यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. अलीकडच्या काळात विहीर, टिंग्या या चित्रपटांमध्येही विठ्ठल उमप यांनी छोटेखानी भूमिका साकारल्या. लवकरच प्रदर्शित होणा-या गजेंद्र अहिरे यांच्या ‘ सुंबरान’ या चित्रपटातही त्यांची भूमिका आहे. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातूनही त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचं दर्शन घडतं. विठ्ठल उमप यांच्या निधनामुळे मराठी लोककलेची, रंगभूमीचं मोठं नुकसान झाल्याची भावना सांस्कृतिक वर्तुळात व्यक्त होतेय. संपूर्ण आयुष्य समाजासाठी जगलेल्या या शाहिरानं शेवटचा श्वासही एका सामाजिक कार्यक्रमातच घ्यावा, हा योगायोगच म्हणावा लागेल. आता त्यांची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी त्यांचे चिरंजीव आदेश, नंदेश आणि उदेश यांच्यावर आहे.विठ्ठल उमप हे नाव घेतले की डोळ्यापुढे येते ते ' जांभुळ आख्यान ' या लोकनाट्यातल्या त्यांच्या बेहतरीन अदाकारी. एकदा मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात त्यांनी ' जांभुळ आख्यान ' सादर केले तेव्हा प्रयोग संपल्यानंतर मंत्रमुग्ध झालेले विक्रम गोखले प्रेक्षकांतून आले आणि त्यांच्या पाया पडले. भल्याभल्यांनी अचंबित व्हावे अशी त्यांची ती द्रौपदी होती. या भूमिकेसाठी त्यांना म. टा. सन्मान पुरस्कार मिळाला. इथवर पोचायला त्यांना वयाची पंच्याहत्तरी गाठावी लागली. त्यांना बालवयात काय काय करावे लागले नाही ? त्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी चणेफुटाणे विकले , हमाली केली , पडेल ते काम स्वीकारले. जन्मजात दारिद्र्यावर अनेकांनी मात केली. एका दलित कुटुंबात जन्म झाल्याने त्यांच्या वाट्याला संघर्ष अटळ होता. इतरांना किमान सामाजिक प्रतिष्ठा होती , तीही उमपांच्या वाट्याला आली नाही. तरीही आपल्यातल्या सुप्त कलागुणांची कस्तुरी जेव्हा त्यांना सापडली तेव्हा त्यांनी या कलासागरात स्वत:ला झोकून दिले. त्यांच्यातल्या उत्तुंग अभिनय गुणांनी त्यांनी लोककलेला जगाच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून दिले. उमपांचे वैशिष्ट्य असे की ते कवीही आहेत , संगीतकार आणि अभिनेतेही. त्यांनी अनेक गजल , कविता , गीते आणि पोवाडे लिहिले आहेत. या बिगरकोळ्याने ' ये दादा हावर ये ' म्हणत कोळी गीतांच्या ध्वनिमुदिका लोकप्रिय केल्या. आकाश-वाणीवरून हजारो गीते पेश केली. गोंधळ , भारुड , जागरण घालावे ते विठ्ठलदादांनीच. ' फू बाई फू ' गाताना किंवा ' कृष्णा थमाल रे ' पेश करताना ते गाणे असे काही रंगवत नेतात की अर्धा अर्धा तास श्रोता हलत नसे. १९८३ साली आयर्लंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकसंगीत महोत्सवात उमपांनी भारताला प्रथम क्रमांक मिळवून दिला होता. रंगभूमीच्या मुख्य धारेत त्यांनी ' अबक दुभक तिभक ', ' खंडोबाचं लगीन ', ' बया दार उघड ' अशी नाटके गाजवली. अनेक अपमान , अवहेलना सोसतानाही चेहऱ्यावरचे हसू न हरवलेल्या या कलावंताने अनेक मान-सन्मानही मिळवले आणि आपले श्रेष्ठत्व सिध्द केले. वामनदादा कर्डक , कृष्णा शिंदे , माशेलकर , पोवळे या पिढीतल्या उमप यांनी कव्वालीचे जंगी सामने गाजविले. संत तुकडोजी महाराजांच्या परंपरेचे एकतारी , दिमडीवरचे भजन , नाथांची भारूडे , उर्दू शायरी , जानपद गीते , पाळणे , पोवाडे , कोळीगीते अशा विविध प्रकारचे गायन व काव्यलेखनही उमप यांनी केले. म्हणूनच शाहीर फक्त शाहीर राहीले नाहीत तर ख-या अर्थाने लोककलेचा ' विठ्ठल ' ठरले.कव्वाली असो वा अभंग...कोळीगीत असो वा लावणी...कलेच्या सर्व प्रांतात मुक्त संचार करणारे, परंपरा आणि नवता यांचा सुरेख आणि सुरेल संगम असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लोकशाहीर, ‘ जांभूळ आख्यान ’ कार विठ्ठल उमप यांचं शनिवार  २७ नोहेम्बेर २०१० रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. नागपुरात दीक्षाभूमीजवळ एका दूरचित्रवाहिनीचं लाँचिंग विठ्ठल उमप यांच्या प्रमुख उपस्थितीत होत होतं. त्यावेळी गौतम बुद्धांच्या मूर्तीला शाहिरांनी वाकून प्रणाम केला आणि विराट जनसागरासमोर ‘ जय भीम ’ चा जोरदार नारा दिला. तेव्हाच चक्कर येऊन ते व्यासपीठावर कोसळले. हे दृश्य पाहून सगळ्यांच्याच काळजात धस्स झालं. शाहिरांना तातडीनं उपचारासाठी नेण्यात आलं, पण तोवर त्यांची प्राणज्योत मालवली 



Saturday, January 29, 2011

संगणक गुरु -डॉ. विजय पांडुरंग भटकर

डॉ. विजय पांडुरंग भटकर
       विजय पांडुरंग भटकर  हे मराठी, भारतीय संगणकशास्त्रज्ञ  आहेत.
विजय पांडुरंग भटकर हे मूळचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा  या अडीचशे-तीनशे लोकवस्तीच्या गावाचे. जन्म ११  ऑक्टोबर १९४साली त्यांचे मूळ घर जनावरांचा गोठा आणि पडक्या भिंती असलेल्या जुनाट वाड्यात. त्यांनी आपले इलेक्ट्रिकल इंजिनीरिंगचे शिक्षण मुरंबा, करजागाव, मुर्तिजापूर, अमरावती, नागपूर, वडोदरा आणि दिल्ली अशा अनेक ठिकाणी फिरून पी. एचडी. पर्यंत पूर्ण केले. भटकरांनी शिक्षणाच्या काळात सर्व विषयांतील साधारणत: पन्नास हजार पुस्तके वाचली. शिक्षणानंतर, त्यांना परदेशी नोक-यांची अनेक आमंत्रणे होती, पण त्यांनी भारतातच राहायचे ठरवले होते
   भारताने ह्या अटी नाकारून डॉ.भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपला स्वत:चा महासंगणक बनवण्याचे ठरवले. भटकर हे तेव्हा 'इलेक्ट्रॉनिक रिसर्च ऍंड डेव्हलपमेण्ट सेण्टर'चे संचालक म्हणून त्रिवेंद्रमला कार्यरत होते. ते महासंगणक बनवण्यासाठी पुण्यातील एनआयसीत आले. तोवर त्यांना महासंगणकाचा कोणताही अनुभव नव्हता. हवामानाच्या अंदाजातील अचूकता वाढवण्यासाठी महासंगणक ही भारताची मोठी गरज होती. त्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने भरारी घ्यायची स्वप्ने पाहणारे पंतप्रधान राजीव गांधीनी सी-डॅक या संस्थेची स्थापना पुणे विद्यापीठात   जून १९८८   रोजी केली. डॉ.विजय भटकरांनी परम-८०० हा महासंगणक अमेरिकेने देऊ केलेल्या किंमतीच्या निम्म्या किंमतीत आणि निम्म्या वेळेत करून दिला. त्याला उद्देशून ‘वॉल स्ट्रीट जर्नलने’ ही बातमी दिली होती.

   विक्रम साराभाईंच्या अध्यक्षतेखाली इलेक्ट्रॉनिक्स कमिशनची स्थापना १९६८साली झाली. त्या कमिशनवर भटकरांनी दहा वर्षे काम केले. ते इंदिरा गांधीनीं 'इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार' साठी  १९७२साली नेमलेल्या महत्त्वाच्या समितीचे सदस्य होते. त्यांनी (त्रिवेंद्रममध्ये इलेक्ट्रॉनिक रिसर्च ऍन्ड डेव्हलपमेंट या भारतातील सर्वात मोठया प्रयोगशाळेची स्थापना केली. ते या संस्थेचे १९८०  ते १९८७ या काळात ते संचालक होते.) भटकरांच्या मार्गदर्शनाखाली केरळमध्ये अठरा कारखाने उभारले गेले.१९८२ च्या एशियाडच्या वेळी भारतात दूरदर्शनचे प्रसारण रंगीत असावे असे सरकारला वाटले. इतर ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या मते हे शक्य नव्हते, त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधीनी ही कामगिरी भटकरांवर सोपवली. त्यासाठी केल्ट्रॉन आणि तिरुअनंतपूरमच्या इलेक्ट्रॉनिक्स संशोधन संस्थेने भटकरांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नांची पराकाष्ठा करून हे उद्दिष्ट पूर्ण केले. भटकरांनी इलेक्ट्रॉनिक्सची अनेक उपकरणे व प्रणाली विकसित केली. सुरक्षिततेच्या आणि उत्पादन क्षमतेच्या बाबतीत त्यांनी भिलाई प्लान्टमध्ये सुधारणा करून दिल्या. रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण प्रणाली, उद्योगातील स्वयंचलित यंत्रणा, कोलकात्ता भुयारी रेल्वेची संगणकीय प्रणाली त्यांनी विकसित केल्या. भटकर टाटा कन्सल्टन्सीत 1987 मध्ये उपाध्यक्ष झाले
    भटकरांनी १९९३  मध्ये परम-८००  तर १९९८ मध्ये परम-१००० मध्ये परम-1000 संगणक बनवले. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ, हा संगणक प्रती सेकंद एक अब्ज गणिते करू शकतो. अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठे संशोधन, वैद्यकीय हवामान, अभियांत्रिकी, लष्करी अशा अनेक क्षेत्रांसाठी हा संगणक उपयोगी पडतो. विकसनशील देशातील असा हा एकमेव संगणक आहे. एवढ्या क्षमतेचा संगणक अमेरिका आणि जपान सोडता फक्त भारतात आहे.

त्यांनी भारतातील सर्व भाषा संगणकांवर आणून साक्षरच काय पण निरक्षरही संगणक साक्षर व्हावा असा प्रयत्न केला. त्यांनी पुण्यातील सी-डॉकमध्ये (Centre for Development of Advanced Computing) प्रगत संगणकीय शिक्षण केंद्र सुरू करून हजारो मुलांना संगणकाचे शिक्षण दिले. तेथील मुले आज जगात भारताचे नाव उज्जवल करत आहेत. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ही पदव्युत्रर शिक्षणाची संस्था त्यांनी स्थापन केली. महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेततेसाठी त्यांनी स्पेशल प्रोटेक्शन ग्रूपला संगणकीय प्रणाली बनवून दिली. त्यांनी एसएमएससाठी भारतीय भाषांची प्रणाली विकसित केली. शाळेपर्यंत न पोचणा-या मुलांसाठी 'एज्युकेशन टू होम' (इटीएच) ही संकल्पना मांडून त्यासाठी १९९८ -९९ मध्ये इटीए संशोधन शाळा सुरू केली. त्यामुळे भारत हा जगातील सर्वात मोठा संगणक साक्षर देश बनेल, ग्रामीण भागात संगणक शिक्षणाचा प्रसार अधिक होण्यासाठी डिजिटल स्कूल काढून त्याद्वारे वीस लाख लोकांना शिक्षण दिले. त्यांनी घरात येणा-या एकाच वायरमधून आपल्याला फोन-टिव्ही आणि संगणक चालवता येतील अशी ब्रॉड ब्रँड प्रणाली विकसित केली. भटकरांनी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन, डीव्हीनेट, मल्टिया, डिशनेट या संस्थाही स्थापन केली.


                                                    

 नाव :--
 डॉ. विजय पांडुरंग भटकर
 जन्म :--
११ ऑक्टोबर १९४६ ,मुरंबा .अकोला ,महाराष्ट्र 
 कार्य स्थिती :-
चेअरमन ,इ .टी.एच रिसर्च संस्था 
 शिक्षण :--
बी .इ .नागपूर युनिवर्सिटी१९६५ 
एम .इ  - बरोडा १९६९ 
पी. एच .डी -आय,आय .टी  दिल्ही ,१९७२ 
 पुरस्कार:-- 
 पद्मश्री -२००० 
महाराष्ट्र भूषण -१९९९-२००० 
लोकमान्य टिळक पुरस्कार 
इलेक्ट्रोनिक्स एयर  पुरस्कार 
प्रियदर्शनी पुरस्कार -२०००