Tuesday, April 12, 2011

मराठी अभिनेत्री -जयश्री गडकर

जयश्री गडकर 
हंसा वाडकर यांच्यानंतर तमाशा - लावणीपटात त्यांची जागा कोण भरून काढेल आणि सोज्वळ, सात्विक भूमिका करणा-या सुलोचनाबाईंच्या जागी कोणाला घ्यावं, या प्रश् ‍ नांना जयश्री गडकर यांनी आपल्या चतुरस्त्र आणि कसदार अभिनयाने उत्तर दिलं. अष्टपैलू अभिनेत्री असाच यांचा वावर मराठी चित्रपटसृष्टीत राहिला. ‘सांगत्ये ऐका’ , ‘ सवाल माझा ऐका ’ , ‘ एक गाव बारा भानगडी ’ यांसारखे तमाशापट, ‘ मानिनी’ , वैशाख-वणवा ’ सारखे सोज्वळ चित्रपट तर ‘ मोहित्यांची मंजुळा’ सारखे ऐतिहासिक चित्रपटात त्यांनी विविधांगी भूमिका केल्या होत्या. ‘ अशी असावी सासू ’ या चित्रपटाची निर्मिती , कथालेखन आणि दिग्दर्शनही त्यांनी केले होते. अभिनय क्षेत्रातल्या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा २००३ सालचा व्ही. शांताराम पुरस्कार, विविध चित्रपटांसाठी राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत . मराठी चित्रपट महामंडळातर्फेही त्यांना चित्रभूषण ' जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. साठ आणि सत्तरच्या दशकात मराठी चित्रपटात जयश्री गडकर यांच्या भूमिका गाजल्या होत्या. आतापर्यंत त्यांनी मराठी, हिंदी आणि इतर भाषांमधल्या २५० चित्रपटांमध्ये काम केले होते. कर्नाटकातील कारवार जिल्ह्यात जन्मलेल्या जयश्री गडकर यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकिर्द सुरू केली. तमाशापटापासून सामाजिक आशय असलेले चित्रपट अशा विविध आशय असलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. जयश्री गडकर यांनी ‘ सासर माहेर ’ आणि ‘ अशी असावी सासू ’ या चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं होतं. ‘ मनिनी ’, ‘ वैजयंता ’, ‘ सवाल माझा ऐका ’ आणि ‘ साधी माणसं ’ या त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. नागपूर -  जयश्री गडकर या मराठी चित्रपट सृष्टीत ५० सोनेरी वर्ष यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या एकमेव अभिनेत्री होत्या. त्यांना प्रेमाची मानवंदना देण्यासाठी जयश्री गडकर प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या असामान्य कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी "जयश्री गडकर : नक्षत्रलेणं' हा ग्रंथ नागपूर शहरात 8 मार्च २००९ ला प्रकाशित करण्यात आला. मराठीतील दिग्गज अशा १२१ मान्यवरांनी जयश्रीबाईंविषयी खास आठवणी या पुस्तकात लिहिल्या आहेत. त्यांच्या कारकिर्दीतील काही खास प्रसंगांची विपूल अशी रंगीत व कृष्णधवल छायाचित्रे यात समाविष्ट आहेत. त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांच्या चित्रपटातील गाजलेली ५० गाणी, चित्रपटांचे कथानक, कलाकार, तंत्रज्ञांची सूची व शंभरहून अधिक हिंदी, गुजराती, पंजाबी इतर भाषांमधील चित्रपटांची माहिती या पुस्तकात आहे, जेष्ठ चित्रपट अभिनेत्री जयश्री गडकर यांचे शुक्रवारी पहाटे मुंबईत निधन झालं. त्या ६६ वर्षाच्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून आजारी असलेल्या गडकर यांचं शुक्रवारी २९ ऑगस्ट २०० रोजी पहाटे ३ वाजता हृद्यविकाराने निधन झाले. अभिनेते बाळ धुरी यांची ती पत्नी होती.


No comments:

Post a Comment