Saturday, January 29, 2011

संगणक गुरु -डॉ. विजय पांडुरंग भटकर

डॉ. विजय पांडुरंग भटकर
       विजय पांडुरंग भटकर  हे मराठी, भारतीय संगणकशास्त्रज्ञ  आहेत.
विजय पांडुरंग भटकर हे मूळचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा  या अडीचशे-तीनशे लोकवस्तीच्या गावाचे. जन्म ११  ऑक्टोबर १९४साली त्यांचे मूळ घर जनावरांचा गोठा आणि पडक्या भिंती असलेल्या जुनाट वाड्यात. त्यांनी आपले इलेक्ट्रिकल इंजिनीरिंगचे शिक्षण मुरंबा, करजागाव, मुर्तिजापूर, अमरावती, नागपूर, वडोदरा आणि दिल्ली अशा अनेक ठिकाणी फिरून पी. एचडी. पर्यंत पूर्ण केले. भटकरांनी शिक्षणाच्या काळात सर्व विषयांतील साधारणत: पन्नास हजार पुस्तके वाचली. शिक्षणानंतर, त्यांना परदेशी नोक-यांची अनेक आमंत्रणे होती, पण त्यांनी भारतातच राहायचे ठरवले होते
   भारताने ह्या अटी नाकारून डॉ.भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपला स्वत:चा महासंगणक बनवण्याचे ठरवले. भटकर हे तेव्हा 'इलेक्ट्रॉनिक रिसर्च ऍंड डेव्हलपमेण्ट सेण्टर'चे संचालक म्हणून त्रिवेंद्रमला कार्यरत होते. ते महासंगणक बनवण्यासाठी पुण्यातील एनआयसीत आले. तोवर त्यांना महासंगणकाचा कोणताही अनुभव नव्हता. हवामानाच्या अंदाजातील अचूकता वाढवण्यासाठी महासंगणक ही भारताची मोठी गरज होती. त्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने भरारी घ्यायची स्वप्ने पाहणारे पंतप्रधान राजीव गांधीनी सी-डॅक या संस्थेची स्थापना पुणे विद्यापीठात   जून १९८८   रोजी केली. डॉ.विजय भटकरांनी परम-८०० हा महासंगणक अमेरिकेने देऊ केलेल्या किंमतीच्या निम्म्या किंमतीत आणि निम्म्या वेळेत करून दिला. त्याला उद्देशून ‘वॉल स्ट्रीट जर्नलने’ ही बातमी दिली होती.

   विक्रम साराभाईंच्या अध्यक्षतेखाली इलेक्ट्रॉनिक्स कमिशनची स्थापना १९६८साली झाली. त्या कमिशनवर भटकरांनी दहा वर्षे काम केले. ते इंदिरा गांधीनीं 'इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार' साठी  १९७२साली नेमलेल्या महत्त्वाच्या समितीचे सदस्य होते. त्यांनी (त्रिवेंद्रममध्ये इलेक्ट्रॉनिक रिसर्च ऍन्ड डेव्हलपमेंट या भारतातील सर्वात मोठया प्रयोगशाळेची स्थापना केली. ते या संस्थेचे १९८०  ते १९८७ या काळात ते संचालक होते.) भटकरांच्या मार्गदर्शनाखाली केरळमध्ये अठरा कारखाने उभारले गेले.१९८२ च्या एशियाडच्या वेळी भारतात दूरदर्शनचे प्रसारण रंगीत असावे असे सरकारला वाटले. इतर ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या मते हे शक्य नव्हते, त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधीनी ही कामगिरी भटकरांवर सोपवली. त्यासाठी केल्ट्रॉन आणि तिरुअनंतपूरमच्या इलेक्ट्रॉनिक्स संशोधन संस्थेने भटकरांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नांची पराकाष्ठा करून हे उद्दिष्ट पूर्ण केले. भटकरांनी इलेक्ट्रॉनिक्सची अनेक उपकरणे व प्रणाली विकसित केली. सुरक्षिततेच्या आणि उत्पादन क्षमतेच्या बाबतीत त्यांनी भिलाई प्लान्टमध्ये सुधारणा करून दिल्या. रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण प्रणाली, उद्योगातील स्वयंचलित यंत्रणा, कोलकात्ता भुयारी रेल्वेची संगणकीय प्रणाली त्यांनी विकसित केल्या. भटकर टाटा कन्सल्टन्सीत 1987 मध्ये उपाध्यक्ष झाले
    भटकरांनी १९९३  मध्ये परम-८००  तर १९९८ मध्ये परम-१००० मध्ये परम-1000 संगणक बनवले. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ, हा संगणक प्रती सेकंद एक अब्ज गणिते करू शकतो. अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठे संशोधन, वैद्यकीय हवामान, अभियांत्रिकी, लष्करी अशा अनेक क्षेत्रांसाठी हा संगणक उपयोगी पडतो. विकसनशील देशातील असा हा एकमेव संगणक आहे. एवढ्या क्षमतेचा संगणक अमेरिका आणि जपान सोडता फक्त भारतात आहे.

त्यांनी भारतातील सर्व भाषा संगणकांवर आणून साक्षरच काय पण निरक्षरही संगणक साक्षर व्हावा असा प्रयत्न केला. त्यांनी पुण्यातील सी-डॉकमध्ये (Centre for Development of Advanced Computing) प्रगत संगणकीय शिक्षण केंद्र सुरू करून हजारो मुलांना संगणकाचे शिक्षण दिले. तेथील मुले आज जगात भारताचे नाव उज्जवल करत आहेत. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ही पदव्युत्रर शिक्षणाची संस्था त्यांनी स्थापन केली. महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेततेसाठी त्यांनी स्पेशल प्रोटेक्शन ग्रूपला संगणकीय प्रणाली बनवून दिली. त्यांनी एसएमएससाठी भारतीय भाषांची प्रणाली विकसित केली. शाळेपर्यंत न पोचणा-या मुलांसाठी 'एज्युकेशन टू होम' (इटीएच) ही संकल्पना मांडून त्यासाठी १९९८ -९९ मध्ये इटीए संशोधन शाळा सुरू केली. त्यामुळे भारत हा जगातील सर्वात मोठा संगणक साक्षर देश बनेल, ग्रामीण भागात संगणक शिक्षणाचा प्रसार अधिक होण्यासाठी डिजिटल स्कूल काढून त्याद्वारे वीस लाख लोकांना शिक्षण दिले. त्यांनी घरात येणा-या एकाच वायरमधून आपल्याला फोन-टिव्ही आणि संगणक चालवता येतील अशी ब्रॉड ब्रँड प्रणाली विकसित केली. भटकरांनी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन, डीव्हीनेट, मल्टिया, डिशनेट या संस्थाही स्थापन केली.


                                                    

 नाव :--
 डॉ. विजय पांडुरंग भटकर
 जन्म :--
११ ऑक्टोबर १९४६ ,मुरंबा .अकोला ,महाराष्ट्र 
 कार्य स्थिती :-
चेअरमन ,इ .टी.एच रिसर्च संस्था 
 शिक्षण :--
बी .इ .नागपूर युनिवर्सिटी१९६५ 
एम .इ  - बरोडा १९६९ 
पी. एच .डी -आय,आय .टी  दिल्ही ,१९७२ 
 पुरस्कार:-- 
 पद्मश्री -२००० 
महाराष्ट्र भूषण -१९९९-२००० 
लोकमान्य टिळक पुरस्कार 
इलेक्ट्रोनिक्स एयर  पुरस्कार 
प्रियदर्शनी पुरस्कार -२००० 


                


                                                          

                                                                                                                      

                                                                   

No comments:

Post a Comment