Thursday, January 20, 2011

प्रवचनकार उद्योगपती (वसंत बेडेकर )


वसंत बेडेकर 
मराठी माणसाला धंदा करता येत नाही असे आपण अनेकदा ऐकले असेल. हे ऐकून मला नेहमीच हसू यायचे, कारण धंदा करणे ही काही कुणा जातीची जहागिरी नाही. पण मराठी माणसाच्या रक्तात उद्योग करणे नाही असे म्हणणार्‍यांच्या तोंडाला टाळे लागेल असा शतकपूर्ती समारंभ, बेडेकर मसालेवाले या उद्योगसमूहाने साजरा केला. व्ही. पी. बेडेकर ऍण्ड सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर वसंत बेडेकरांना मी जेव्हा विचारले की ‘‘हा प्रवास कसा वाटला?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘हा माझा एकट्याचा प्रवास नव्हता. माझ्या खापर पणजोबांपासून हा प्रवास सुरू झाला आहे. आम्ही सगळे त्या माळेत गुंफत गेलो.’’ खरं तर सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी कोकणातील राजापूर तालुक्यातील गोवळी गावी बेडेकर घराणे उत्तम प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध होते.
    .धंद्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही पार्श्‍वभूमी नसतानाही कीर्तनकार बेडेकर उद्योजक झाले. धंदा करायचाच या निर्धाराने बेडेकरांनी मुंबईचा रस्ता धरला. गिरगावमधील मुगभाट गल्लीत, शांतारामाच्या चाळीत त्यांनी एक किराणा मालाचे दुकान थाटले. जागा भाड्याची होती, पण आपण नोकरी नाही करायची या विचारांचे असल्यामुळे ते ‘रिक्स’ घ्यायला तयार होते. वसंत बेडेकर सांगतात, लहानपणापासून ते या धंद्यात नसले तरी तो पाहण्यातच त्यांचे लहानपण गेले. शाळेत जाता-येता दुकानात जाणे व्हायचे. पुढे जाऊन हा धंदाच सांभाळायचा हेच त्यांना माहीत होते. बी.एस्सी झाली आणि लगेच धंद्यात पदार्पण हे सर्व ठरलेलेच होते. वडील 1960 मध्ये निवृत्त झाल्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नाही, पण आपल्या ज्येष्ठ बंधू त्र्यंबक बेडेकरांकडून त्यांना खूप काही शिकता आले व त्यांच्या जोडीने या उद्योगाला पुढे नेण्याची संधी मिळाली. लोणची बनवण्याची सुरुवात कशी झाली ही गंमतच आहे. वसंत बेडेकरांच्या वडिलांना खूप ताप आला होता. जिभेची चव गेली होती. शेजारच्या काकींनी लिंबाची फोड दिली. ते खाऊन जरा बरे वाटले. आपण असे लोणचे बनवून विकले तर? या प्रश्‍नाचे उत्तर आहे आजचे प्रसिद्ध ‘बेडेकर लोणचे’. 1 मार्च 1943 रोजी व्ही. पी. बेडेकर ऍण्ड सन्स खासगी कंपनी स्थापन झाली. ‘मसाले कुटून विकणे हे ब्राह्मणाचे काम नाही, त्यांनी फक्त वेदविद्या शिकवावी’ असा सल्ला देऊन त्यांचे पाय खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्यांनी काम सोडले नाही. ते सांगतात, घर अगदी हाकेच्या अंतरावर असूनही घराकडे थोडेसे दुर्लक्ष झाले. पण त्यांची पत्नी उषा यांनी घर सांभाळून त्यांच्या प्रगतीत फार मोठा सहभाग केला. सुरुवातीच्या काळात सकाळी आठ ते रात्री आठ दुकानावर ते बसलेले असायचे. आठवड्यात एक दिवस सुट्टी असायची, पण तीही अगदी नक्की नव्हती. या प्रवासात काही खूप कठीण अनुभव आले

No comments:

Post a Comment