Saturday, January 29, 2011

संगणक गुरु -डॉ. विजय पांडुरंग भटकर

डॉ. विजय पांडुरंग भटकर
       विजय पांडुरंग भटकर  हे मराठी, भारतीय संगणकशास्त्रज्ञ  आहेत.
विजय पांडुरंग भटकर हे मूळचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा  या अडीचशे-तीनशे लोकवस्तीच्या गावाचे. जन्म ११  ऑक्टोबर १९४साली त्यांचे मूळ घर जनावरांचा गोठा आणि पडक्या भिंती असलेल्या जुनाट वाड्यात. त्यांनी आपले इलेक्ट्रिकल इंजिनीरिंगचे शिक्षण मुरंबा, करजागाव, मुर्तिजापूर, अमरावती, नागपूर, वडोदरा आणि दिल्ली अशा अनेक ठिकाणी फिरून पी. एचडी. पर्यंत पूर्ण केले. भटकरांनी शिक्षणाच्या काळात सर्व विषयांतील साधारणत: पन्नास हजार पुस्तके वाचली. शिक्षणानंतर, त्यांना परदेशी नोक-यांची अनेक आमंत्रणे होती, पण त्यांनी भारतातच राहायचे ठरवले होते
   भारताने ह्या अटी नाकारून डॉ.भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपला स्वत:चा महासंगणक बनवण्याचे ठरवले. भटकर हे तेव्हा 'इलेक्ट्रॉनिक रिसर्च ऍंड डेव्हलपमेण्ट सेण्टर'चे संचालक म्हणून त्रिवेंद्रमला कार्यरत होते. ते महासंगणक बनवण्यासाठी पुण्यातील एनआयसीत आले. तोवर त्यांना महासंगणकाचा कोणताही अनुभव नव्हता. हवामानाच्या अंदाजातील अचूकता वाढवण्यासाठी महासंगणक ही भारताची मोठी गरज होती. त्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने भरारी घ्यायची स्वप्ने पाहणारे पंतप्रधान राजीव गांधीनी सी-डॅक या संस्थेची स्थापना पुणे विद्यापीठात   जून १९८८   रोजी केली. डॉ.विजय भटकरांनी परम-८०० हा महासंगणक अमेरिकेने देऊ केलेल्या किंमतीच्या निम्म्या किंमतीत आणि निम्म्या वेळेत करून दिला. त्याला उद्देशून ‘वॉल स्ट्रीट जर्नलने’ ही बातमी दिली होती.

   विक्रम साराभाईंच्या अध्यक्षतेखाली इलेक्ट्रॉनिक्स कमिशनची स्थापना १९६८साली झाली. त्या कमिशनवर भटकरांनी दहा वर्षे काम केले. ते इंदिरा गांधीनीं 'इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार' साठी  १९७२साली नेमलेल्या महत्त्वाच्या समितीचे सदस्य होते. त्यांनी (त्रिवेंद्रममध्ये इलेक्ट्रॉनिक रिसर्च ऍन्ड डेव्हलपमेंट या भारतातील सर्वात मोठया प्रयोगशाळेची स्थापना केली. ते या संस्थेचे १९८०  ते १९८७ या काळात ते संचालक होते.) भटकरांच्या मार्गदर्शनाखाली केरळमध्ये अठरा कारखाने उभारले गेले.१९८२ च्या एशियाडच्या वेळी भारतात दूरदर्शनचे प्रसारण रंगीत असावे असे सरकारला वाटले. इतर ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या मते हे शक्य नव्हते, त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधीनी ही कामगिरी भटकरांवर सोपवली. त्यासाठी केल्ट्रॉन आणि तिरुअनंतपूरमच्या इलेक्ट्रॉनिक्स संशोधन संस्थेने भटकरांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नांची पराकाष्ठा करून हे उद्दिष्ट पूर्ण केले. भटकरांनी इलेक्ट्रॉनिक्सची अनेक उपकरणे व प्रणाली विकसित केली. सुरक्षिततेच्या आणि उत्पादन क्षमतेच्या बाबतीत त्यांनी भिलाई प्लान्टमध्ये सुधारणा करून दिल्या. रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण प्रणाली, उद्योगातील स्वयंचलित यंत्रणा, कोलकात्ता भुयारी रेल्वेची संगणकीय प्रणाली त्यांनी विकसित केल्या. भटकर टाटा कन्सल्टन्सीत 1987 मध्ये उपाध्यक्ष झाले
    भटकरांनी १९९३  मध्ये परम-८००  तर १९९८ मध्ये परम-१००० मध्ये परम-1000 संगणक बनवले. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ, हा संगणक प्रती सेकंद एक अब्ज गणिते करू शकतो. अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठे संशोधन, वैद्यकीय हवामान, अभियांत्रिकी, लष्करी अशा अनेक क्षेत्रांसाठी हा संगणक उपयोगी पडतो. विकसनशील देशातील असा हा एकमेव संगणक आहे. एवढ्या क्षमतेचा संगणक अमेरिका आणि जपान सोडता फक्त भारतात आहे.

त्यांनी भारतातील सर्व भाषा संगणकांवर आणून साक्षरच काय पण निरक्षरही संगणक साक्षर व्हावा असा प्रयत्न केला. त्यांनी पुण्यातील सी-डॉकमध्ये (Centre for Development of Advanced Computing) प्रगत संगणकीय शिक्षण केंद्र सुरू करून हजारो मुलांना संगणकाचे शिक्षण दिले. तेथील मुले आज जगात भारताचे नाव उज्जवल करत आहेत. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ही पदव्युत्रर शिक्षणाची संस्था त्यांनी स्थापन केली. महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेततेसाठी त्यांनी स्पेशल प्रोटेक्शन ग्रूपला संगणकीय प्रणाली बनवून दिली. त्यांनी एसएमएससाठी भारतीय भाषांची प्रणाली विकसित केली. शाळेपर्यंत न पोचणा-या मुलांसाठी 'एज्युकेशन टू होम' (इटीएच) ही संकल्पना मांडून त्यासाठी १९९८ -९९ मध्ये इटीए संशोधन शाळा सुरू केली. त्यामुळे भारत हा जगातील सर्वात मोठा संगणक साक्षर देश बनेल, ग्रामीण भागात संगणक शिक्षणाचा प्रसार अधिक होण्यासाठी डिजिटल स्कूल काढून त्याद्वारे वीस लाख लोकांना शिक्षण दिले. त्यांनी घरात येणा-या एकाच वायरमधून आपल्याला फोन-टिव्ही आणि संगणक चालवता येतील अशी ब्रॉड ब्रँड प्रणाली विकसित केली. भटकरांनी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन, डीव्हीनेट, मल्टिया, डिशनेट या संस्थाही स्थापन केली.


                                                    

 नाव :--
 डॉ. विजय पांडुरंग भटकर
 जन्म :--
११ ऑक्टोबर १९४६ ,मुरंबा .अकोला ,महाराष्ट्र 
 कार्य स्थिती :-
चेअरमन ,इ .टी.एच रिसर्च संस्था 
 शिक्षण :--
बी .इ .नागपूर युनिवर्सिटी१९६५ 
एम .इ  - बरोडा १९६९ 
पी. एच .डी -आय,आय .टी  दिल्ही ,१९७२ 
 पुरस्कार:-- 
 पद्मश्री -२००० 
महाराष्ट्र भूषण -१९९९-२००० 
लोकमान्य टिळक पुरस्कार 
इलेक्ट्रोनिक्स एयर  पुरस्कार 
प्रियदर्शनी पुरस्कार -२००० 


                


                                                          

                                                                                                                      

                                                                   

Saturday, January 22, 2011

मराठी खगोलशास्त्रज्ञ (जयंत नारळीकर )



     जयंत नारळीकर 
जयंत विष्णू नारळीकर  हे मराठी खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत.
जीवन प्रवास -
                    नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८  रोजी झाला. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ होते. वाराणसी  येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले.इ.स १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी (BSc) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केम्ब्रिज  येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या .रंग्लर (ranglor) ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल  व इतर अनेक बक्षिसे मिळाली.
                
संशोधन -
             आजकाल अस बोललं जात की विश्वाची निर्मिती एका विशाल विस्फोट  (बिग बँग) पासून झालेली होती ,पण त्याच्याबरोबर विश्वाच्या निर्मितीबद्दल अजून एक सिद्धांत आहे .त्याला स्थायी अवस्था   सिद्धांत (Steady State Theory) म्हणतात. या सिद्धांताचे जनक फ्रेड हॉयल आहेत .आपल्या इंग्लंड प्रवासाच्या दरम्यान नारळीकरांनी या सिद्धांतावर फ्रेड हॉयल बरोबर काम केलेले होते .म्हणून त्या सिद्धांताला "हॉयल-नारळीकर सिद्धांत "असेही म्हणतात .१९७२  साली ते भारतात परतले - मुंबई येथील टाटा मुलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून पद स्वीकारले.१९८८  साली त्यांची पुणे येथील आयुकासंस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.१९८८ मध्ये विश्वविद्यालय अनुदान आयोगाद्वारे त्यांच्यावर खगोलशास्त्र त्याचबरोबर खगोलभौतिकी अंतर्विश्वाविद्यालय केंद्र( Inter-University Centre for Astronomy and Astrophysics इण्टर-युनिवर्सिटी सेण्टर फॉर एस्ट्रोनॉमी एण्ड एस्ट्रोफिज़िक्स (IUCAA))ची स्थापना करण्याचे कार्य सोपवण्यात आले.त्यांनी २००३ मध्ये अवकाश ग्रहण केले.


साहित्य :-
  • वामन परत न आला
  • अंतराळातील भस्मासुर
  • कृष्णमेघ
  • प्रेषित
  • व्हायरस
  • अभयारण्य
  • यक्षाची देणगी 

पूर्ण नाव
 जयंत विष्णू नारळीकर 
 जन्म 
 १९ जुलै १९३८, कोल्हापूर 
 नागरिकत्व 
 भारतीय 
 कार्यसंस्था 
 केम्ब्रिज विद्यापीठ
टाटा मुलभूत संशोधन संस्था 
आयुका 
 प्रशिक्षण 
 हिंदू बनारस विद्यापीठ 
केम्ब्रिज विद्यापीठ 
 पुरस्कार 
 स्मिथ पुरस्कार (१९६२ )
पद्मभूषण पुरस्कार(१९६५)
एड्म्स पुरस्कार(१९६७)शांतीस्वरूप पुरस्कार (१९७९)
इंदिरा गांधी पुरस्कार 
(१९९०)
कलिंग पुरस्कार (१९९६)
पद्मभूषण पुरस्कार (२००४)

  

Friday, January 21, 2011

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी

पंडित भीमसेन जोशी 
पंडित भीमसेन  हे लोकप्रिय हिंदुस्थानी शास्रीय  गायक आहेत .
संगीत शिक्षण -
                       पंडितजींचे वडिल व्यवसायाने शिक्षक होते. भीमसेनचा संगीताकडे असलेला ओढा त्यांना पसंत नसे आणि भीमसेनांनी वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह होता. या मतभेदांमुळे अखेर भीमसेनांनी घर सोडण्याचे आणि त्याकाळी शास्त्रीय संगीतासाठी ख्यातनाम असलेल्या ग्वाल्हेर , लखनौ ,रामपूर या शहरांपैकी एका ठिकाणी जाण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी इ. स  १९३साली वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडले आणि ग्वाल्हेरात दाखल झाले त्यानंतर त्यांनी खिशात पैसे आणि पोटात अन्न नसूनदेखील गायनाच्या तळमळीपायी उत्तर भारतात अनेक ठिकाणी भटकंती केली. उस्ताद अब्दुल करीम खौ, वझेबुवा, केसरबाई केरकर ,उस्ताद अब्दुल करीम खौ , वगैरेंचे गायन-वादन त्यांनी ऐकले.सुरूवातीला ते इनायत  खौ यांचे शिष्य जनाप्पा कुर्तकोटी  यांच्याकडे गायन शिकले. त्यानंतर जलंदर  येथे पंडित मंगतराम  यांच्याकडे,ग्वाल्हेर येथे राजाभय्या यांच्याकडे गाण्याची दीक्षा घेतली. रामपूर  येथे मुस्ताक हुसेन खौ यांच्याकडे काही काळ शिकले. अशाप्रकारे काही वर्षे ग्वाल्हेर, लखनऊ, रामपूर येथे व्यतित केल्यानंतर त्यांचा शोध घेत असलेल्या त्यांच्या वडिलांशी भेट झाली आणि भीमसेन पुन्हा घरी परत आले. भीमसेनांचा संगीतासाठीचा तीव्र ओढा पाहून त्यांचे वडिल भीमसेनांना जवळच असलेल्या कुंदगोळ  गावातील रामभाऊ कुंदगोळकर  यांच्याकडे घेऊन गेले आणि रामभाऊंनी भीमसेनांना त्यांचे शिष्यत्व दिले. रामभाऊ जे ’सवाई गंधर्व’ म्हणून ख्यातनाम आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली, भीमसेनांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. रामभाऊ हे किराणा घरानाच्या  पद्धतीचे गायक होते. त्याकाळातील परंपरेनुसार भीमसेनांनी गुरूगृही राहून कष्टपूर्वक गायनाचे धडे घेतले. रामभाऊ त्यांच्याकडून तोडी ,पुरिया ,मुलतानी  वगैरे रागांवर रोज सुमारे आठ तास मेहनत करवून घेत. आणि त्यांच्याकडून भीमसेनांनी इ .स १९३६  ते इ .स १९४१ पर्यंतच्या काळात शक्यतेवढे ज्ञान आत्मसात केले. रोज सोळा तासांचा रियाज  करण्याचा ते स्वतःचा दंडक पाळीत. त्यानंतर गुरू रामभाऊंच्या आज्ञेनुसार भीमसेनांनी त्यांचा निरोप घेतला आणि पुणे येथे आले.
आजही पंडित भीमसेन जोशी त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सवाई गंधर्व संगीत  महोत्सव पुणे येथे भरवितात. हा महोत्स्व पंडितजींनी १९५२ साली सुरू केला
.
कारकीर्द-
             भीमसेनांनी त्यांची पहिली संगीत मैफल इ .स १९४२  साली वयाच्या केवळ एकोणविसाव्या वर्षी पुण्यातील हिराबागेत घेतली. त्यापुढील वर्षीच त्यांनी कानडी आणि हिंदी भाषेतील काही उपशास्त्रीय गीते गाऊन पहिले ध्व्नीमुद्रण केले आणि पुढील काही वर्षांमध्ये त्यांनी शास्त्रीय गाण्यांचे पहिले ध्वनीमुद्रण केले.सवाई   गंधर्वाच्या  षष्ट्यब्दी सोहळ्यानिमीत्त त्यांनी गायन केले आणि महाराष्ट्राला त्यांची ओळख झाली त्यांची लोकप्रियता आणि त्यामुळे त्यांच्या जीवनशैलीतील व्यस्तता वाढली. त्याकाळात त्यांना पु .ल .देशपांडे  यांनी गंमतीने 'हवाईगंधर्व' ही पदवी बहाल केली. कारण त्यांना वारंवार करावा लागणारा विमान प्रवास. कित्येक वेळा एकाच दिवसात दोन शहरातील मैफली घेण्यासाठी ते दोनदा विमान प्रवास करीत .
       पंडितजींना आधुनिक हिंदुस्थानी शास्त्रीय गायन पद्धतीचे किंवा ख्याल गायक  म्हणतात. परंतू १९४० च्या दशकात त्यांनी लखनौ  मध्ये एक वर्ष राहून तेथील ख्यातनाम ठुमारू  गायकांकडून ती शिकून घेतली. आज ते दोन्ही पद्धतीने लीलया गातात. असे म्हणतात की ख्याल गायकीपेक्षा ठुमरी गायन अधिक कठिण आहे. अभंगगायन हा तर पंडितजींचा हातखंडा विषय! 'संतवाणी' या नांवाने पंडितजींनी अ़क्षरश: हजारो कार्यक्रम केले. 

मराठी अभंग-
            मराठीतील त्यांनी गायलेले अभंग अतिशय लोकप्रिय झाले आहेत. त्यातील काही उल्लेखनीय म्हणजे :

  • अगा वैकुंठीच्या राया
  • आता कोठे धावे मन
  • अधिक देखणे तरी
  • अणुरणीया थोकडा, तुका आकाशाएवढा
  • आरंभी वंदिन, अयोध्येचा राजा
  • ज्ञानियांचा राजा, गुरु महाराव
  • इंद्रायणी काठी
  • कान्होबा, तुझी घोंगडी चांगली
  • काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल
  • मन, रामरंगी रंगले
  • माझे माहेर पंढरी
  • नामाचा गजर, गर्जे भीमातीर
  • पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान
  • रूप पाहता लोचनी
  • तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल
  • पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा 

Thursday, January 20, 2011

प्रवचनकार उद्योगपती (वसंत बेडेकर )


वसंत बेडेकर 
मराठी माणसाला धंदा करता येत नाही असे आपण अनेकदा ऐकले असेल. हे ऐकून मला नेहमीच हसू यायचे, कारण धंदा करणे ही काही कुणा जातीची जहागिरी नाही. पण मराठी माणसाच्या रक्तात उद्योग करणे नाही असे म्हणणार्‍यांच्या तोंडाला टाळे लागेल असा शतकपूर्ती समारंभ, बेडेकर मसालेवाले या उद्योगसमूहाने साजरा केला. व्ही. पी. बेडेकर ऍण्ड सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर वसंत बेडेकरांना मी जेव्हा विचारले की ‘‘हा प्रवास कसा वाटला?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘हा माझा एकट्याचा प्रवास नव्हता. माझ्या खापर पणजोबांपासून हा प्रवास सुरू झाला आहे. आम्ही सगळे त्या माळेत गुंफत गेलो.’’ खरं तर सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी कोकणातील राजापूर तालुक्यातील गोवळी गावी बेडेकर घराणे उत्तम प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध होते.
    .धंद्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही पार्श्‍वभूमी नसतानाही कीर्तनकार बेडेकर उद्योजक झाले. धंदा करायचाच या निर्धाराने बेडेकरांनी मुंबईचा रस्ता धरला. गिरगावमधील मुगभाट गल्लीत, शांतारामाच्या चाळीत त्यांनी एक किराणा मालाचे दुकान थाटले. जागा भाड्याची होती, पण आपण नोकरी नाही करायची या विचारांचे असल्यामुळे ते ‘रिक्स’ घ्यायला तयार होते. वसंत बेडेकर सांगतात, लहानपणापासून ते या धंद्यात नसले तरी तो पाहण्यातच त्यांचे लहानपण गेले. शाळेत जाता-येता दुकानात जाणे व्हायचे. पुढे जाऊन हा धंदाच सांभाळायचा हेच त्यांना माहीत होते. बी.एस्सी झाली आणि लगेच धंद्यात पदार्पण हे सर्व ठरलेलेच होते. वडील 1960 मध्ये निवृत्त झाल्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नाही, पण आपल्या ज्येष्ठ बंधू त्र्यंबक बेडेकरांकडून त्यांना खूप काही शिकता आले व त्यांच्या जोडीने या उद्योगाला पुढे नेण्याची संधी मिळाली. लोणची बनवण्याची सुरुवात कशी झाली ही गंमतच आहे. वसंत बेडेकरांच्या वडिलांना खूप ताप आला होता. जिभेची चव गेली होती. शेजारच्या काकींनी लिंबाची फोड दिली. ते खाऊन जरा बरे वाटले. आपण असे लोणचे बनवून विकले तर? या प्रश्‍नाचे उत्तर आहे आजचे प्रसिद्ध ‘बेडेकर लोणचे’. 1 मार्च 1943 रोजी व्ही. पी. बेडेकर ऍण्ड सन्स खासगी कंपनी स्थापन झाली. ‘मसाले कुटून विकणे हे ब्राह्मणाचे काम नाही, त्यांनी फक्त वेदविद्या शिकवावी’ असा सल्ला देऊन त्यांचे पाय खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्यांनी काम सोडले नाही. ते सांगतात, घर अगदी हाकेच्या अंतरावर असूनही घराकडे थोडेसे दुर्लक्ष झाले. पण त्यांची पत्नी उषा यांनी घर सांभाळून त्यांच्या प्रगतीत फार मोठा सहभाग केला. सुरुवातीच्या काळात सकाळी आठ ते रात्री आठ दुकानावर ते बसलेले असायचे. आठवड्यात एक दिवस सुट्टी असायची, पण तीही अगदी नक्की नव्हती. या प्रवासात काही खूप कठीण अनुभव आले

Thursday, January 13, 2011

असा महान कलावंत पुन्हा जन्मणार नाही


.            
प्रभाकर पणशीकर 
प्रभाकर पणशीकर
पूर्ण नावप्रभाकर विष्णू पणशीकर
जन्म१४ मार्चइ.स. १९३१
मुंबईमहाराष्ट्र
मृत्यू१३ जानेवारीइ.स. २०११
पुणेमहाराष्ट्र
अन्य नाव/नावेपंत
कार्यक्षेत्रनाट्य अभिनेता, दिग्दर्शन, निर्माता
राष्ट्रीयत्वभारतीय
भाषामराठीहिंदीइंग्रजी
कारकिर्दीचा काळइ.स. १९५५ - इ.स. १९९५
प्रमुख नाटकेतो मी नव्हेच, इथे ओशाळला मृत्यू,अश्रूंची झाली फुलेबेईमान
पुरस्कारसंगीत नाटक अकादमी पुरस्कार
महाराष्ट्र गौरव पुरस्कार
जागतिक मराठी परिषद पुरस्कार,महाराष्ट्र भूषण पुरस्कार
 प्रभाकर पणशीकर तथा पंत  हे मराठी रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते होते.  'तो मी नव्हेच' ह्या नाटकात साकार केलेल्या पाच वेगवेगळ्या भूमिकांमुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. 'इथे ओशाळला मृत्यू' ह्या संभाजीराजांच्या मृत्यूवरील आधारित नाटकातील औरंगजेबाची भूमिकादेखील पंतानी अजरामर केली. त्यांनी स्थापन केलेल्या नाट्यसंपदा ह्या नाट्यंसंस्थेचे 'कट्यार काळजात घुसली' हे संगीत नाटक नाट्यरसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.प्रभाकर पणशीकरांनी त्यांच्या अथक ५० वर्षांच्या स्वर्णिम कारकिर्दीत नाटकांचे सुमारे ८००० च्या वर प्रयोग केले. मराठीसोबतच गुजराती व कन्नड भाषेतही त्यांनी आपली अभिनय प्रतिभा दाखवली. ४ मराठी चित्रपट, ४ मराठी मालिका यांसोबतच एक इंग्रजी मालिका केल्या आणि रेडिओसाठी तर असंख्य नाट्यवाचने केली
    पणशीकरांचा जन्म मुंबईत फणसवाडी येथे वेदविद्यासंपन्न ब्राह्मण कुटुंबात झाला. पंतांचे वडील विष्णुशास्त्री हे दशग्रंथी ब्राह्मण होते, तर त्यांचे आजोबा वासुदेवशास्त्री हे संस्कृत प्रकांडपंडित होते.लहानग्या प्रभाकरचा ओढा मात्र नाट्यक्षेत्राकडे होता. शाळेत असताना वेगवेगळ्या प्रसिद्ध नाटक कंपन्यांची नाटके त्यांनी पाहिली. एवढेच नव्हे तर ती नाटके पुढे गिरगावात गणेशोत्सवात सादर केली. त्यामुळे पौगंडावस्थेतच त्यांना घरापासून परागंदा व्हावे लागले. १३ मार्च ई.स १९५५  ह्या दिवशी ’राणीचा बाग’ ह्या नाटकाद्वारे प्रभाकर पणशीकरांनी मराठी रंगभूमीवर प्रवेश केला. वयाच्या पंचविशीत त्यांनी लेखक-दिग्दर्शक  मो. ग. रांगणेकरांच्या’नाट्यनिकेतन’ या संस्थेत प्रवेश केला आणि ’कुलवधू’, ’भूमिकन्या सीता’, ’वहिनी’, ’खडाष्टक’ अशा नाटकांमधून कामे करण्यास सुरुवात केल
    इ.स. १९६२ साली रांगणेकरांनी जेव्हा अत्र्यांचे ’तो मी नव्हेच’ हे नाटक सादर करायचे ठरवले तेव्हा अत्र्यांनी सुचवलेली अन्य नटांची नावे धुडकावून रांगणेकरांनी पंतानाच मुख्य भूमिका करण्याची गळ घातली. पंतानी ती अर्थातच मान्य केली आणि १५ ऑगस्ट १९६२ ला ’तो मी नव्हेच’चा मुहूर्ताचा प्रयोग झाला. या नाटकात पंतांनी लखोबा लोखंडे, दिवाकर दातार, दाजीशास्त्री दातार, कॅप्टन अशोक परांजपे आणि राधेश्याम महाराज अशा पाच वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तीच्या भूमिका, काही क्षणांत भूमिकाबदलांसह साकारायचे शिवधनुष्य लीलया पेलले. रसिकांचे पराकोटीचे प्रेम आणि कीर्ती पंतांना ’तो मी नव्हेच’ने मिळवून दिली.